आता राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा अशक्य ?

आता राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा अशक्य ?

राजकीय विश्लेषकांचे का आहे असे निरीक्षण?

केंद्रीय निवणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय या तीनही पक्षांसाठी मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर काय होणार याविषयी अधिक माहिती जाणून घ्या?

यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांचा समावेश होता. आधी निवडणूक आयोग दर पाच वर्षांनी राष्ट्रीय दर्जा देण्याबाबतचा निर्णय घ्यायचं. पण २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाने यामध्ये बदल केला. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दर दहा वर्षांनी देण्याचं निश्चित केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता पुढचे दहा वर्ष राष्ट्रीय दर्जा मिळणार नाही, अशी शक्यता आहे. राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांचा मते, “राष्ट्रवादीला अपेक्षित मते आणि लोकप्रतिनिधी मिळण्यासाठी २०२४च्या निवणुकीत चार राज्यत निवणूका लढवाव्या लागतील. काँग्रेस सोबत निवणूक लढताना राष्ट्रवादीसाठी हे शक्य नाही त्यामुळे राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिल्ने आता अवघड आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या राजकीय पक्षांचे चिन्ह हे राखीव असतं. त्यांच्या चिन्हाचा वापर देशभरात कुणीही करु शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने आता त्यांचं घड्याळ चिन्ह इतर राज्यांमध्ये इतर कुणालाही मिळू शकतो. याशिवाय इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवायची असल्यास राष्ट्रवादीला आता वेगवेगळे चिन्हं घ्यावे लागण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षांना निवडणुकीच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीवर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version