नाशकात काय बोले फडणवीस ?

नाशकात काय बोले फडणवीस ?

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये आजपासून आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते.

ही बैठक १० आणि ११ फेब्रुवारी रोजी पार पडली. भारतीय जनता पार्टीचे सर्व केंद्रीय आणि राज्य मंत्री या बैठकीस हजर होते. तर शनिवारी देखील दिवसभर भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले,”‘ नाशकात असुरी शक्तीचा विनाश झाला आहे. भाजपाच्या महाविजयाचा मंत्र यशस्वी करा असे फडणवीस म्हणाले.

‘नाशकात असुरी शक्तीचा विनाश झाला’
प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून देवेंद्र फडणवीस
भाजपाच्या महाविजयाचा मंत्र यशस्वी करा – फडणवीस

‘मविआची अडीच वर्षे नेत्यांचे घर भरणारी”निवडणुकीत विजय मिळवूनच भाजपा यशस्वी होईल’
मविआने राज्याच्या प्रगतीची संधी घालवली – फडणवीस

‘मविआचे सरकार गद्दारांचे होते’
‘राज्यातले आत्ताचे सरकार खुद्दार अर्थात स्वाभिमानी लोकांचे’
‘उरलेल्यांना रोखायला आमच्यावर गद्दारीचे आरोप’

‘सर्वोच्च न्यायालयात निकाल शिंदे सरकारच्या बाजूने येईल’
‘शिंदे सरकार राज्य घटनेच्या अनुसारच’
‘शिंदे सरकार कार्यकाळ पूर्ण करू, पुन्हा सत्तेत येऊ’

‘मविआचा कारभार, ठप्प सरकार’
‘आमच्या सरकार कडून २४ हजार कोटींच्या कामाला मान्यता’
‘गोदावरीचे वाहून जाणारे पाणी वाचवणार’

विदर्भ, मराठवाड्याचे पाणी प्रश्न सोडवणार’
‘एक लाख कोटींचा खर्च करून पाणी प्रश्न सोडवू’
‘राज्याच्या तिजोरीवर भर न टाकता पैसे उभारू’

‘महाराष्ट्रात लवकरच ताशी अडीचशे किलोमीटरने धावणारी रेल्वे’
‘नाशिक – नवमेट्रोचे केंद्रात सादरीकरण पुढील आठवड्यात’

कृषी पंप सौर उर्जेवर चालवणार – ऊर्जामंत्री
‘सौर ऊर्जेमुळे उद्योजकांना स्वस्त वीज देऊ’
‘वीज प्रकल्पासाठी जमीन दिल्यास एकरी ७५ हजार भाडे’
आम्हाला भाड्याने जमीन देण्यास शेतकरी उत्सुक – फडणवीस

‘राममंदिर आणि कलम ३७० हे राष्ट्रवादाचे मुद्दे’
‘राष्ट्रवादासोबत गरीब कल्याण हे सुद्धा प्राधान्य’

‘पुन्हा आपले सरकार आले पाहिजे’,
जनतेत चला, आपण जिंकूच – फडणवीस

‘नवमतदार समाज माध्यमातून प्रभावित होतोय’
‘आपल्यातले अनेक समाज माध्यमातून निष्क्रिय’
‘विरोधक समाज माध्यमात नकारात्मकता पसरवतायत’

‘आपल्या पराभवाचे आत्मचिंतन गरजेचे’
‘अमरावतीच्या पराभवातून काही शिकणार की नाही?’
फडणवीसांनी ऐकवले कार्यकर्त्यांना खडेबोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version