जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेमधली गटबाजीच चव्हाट्यावर आली. शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी शिवसेनेच्याच मंत्र्यांना घरचा आहेर दिला. शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेच्या स्थापनेदिवशीच हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
हाजी अराफत शेख यांनी दिवाकर रावतेंवर जहरी टीका केली. धर्म काढणारे दिवाकर रावते काय कामाचे असा सवालच हाजी अराफत यांनी विचारला. आपलेच परिवहन मंत्री असून गेल्या तीन वर्षांत रिक्षावाल्यांसाठी एकही स्टँड बांधला नाही. रावते माझा धर्म काढतात. माझ्या समर्थकांना भेटत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.