जय महाराष्ट्र , मुंबई
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेशिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. पहाटे काकड आरतीसोबत अनेक भाविकांनी साईंचे दर्शन घेतले. साईनामाच्या
जयघोषात शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे.
अनेक ठिकाणाहून शेकडो साईपालख्या ढोल, ताशांच्या गजरात गुरुपोर्णिमेच्या उत्सवासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. हा उत्सव साईसंस्था देखील मोठ्या
उत्साहाने साजरा करतात.
भाविकांच्या स्वागतासाठी साईसमाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसेच चावडी आकर्षकरित्या सजवण्यात आली आहे.
पायी पालखीदेखील येथे मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. पुण्याची साई पालखी आज सकाळी शिर्डीत दाखल झाली. या पालखीमुळे संपूर्ण शिर्डीत
आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.