मंगळवारी राज्यात १८ हजार ४६६ कोरोना रुग्ण

मंगळवारी राज्यात १८ हजार ४६६ कोरोना रुग्ण

मुंबईत १० हजार ८६० रुग्ण कोरोनाबाधित

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १८ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मुंबईत सर्वाधिक १० हजार ८६० कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांत वाढ होत असून कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधीदेखील आता ११० दिवसांवर आला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णवाढ पाहता, पालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोरील चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडक निर्बंध लादले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्रालय आणि अधिकारी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक असून यात निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version