सांगलीत एसटी आणि आयशर ट्रकचा अपघात;18 प्रवासी जखमी

सांगलीत एसटी आणि आयशर ट्रकचा अपघात;18 प्रवासी जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत एसटी आणि आयशर ट्रकचा अपघात झालाय. सांगलीच्या नवीन बायपास रोडवर हा अपघात झालाय. या अपघातात एसटीतील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

सांगलीहुन इस्लामपूरकडे निघालेल्या एसटीची समोरून येणाऱ्या आयशरला धडक बसली. अपघातानंतर सांगलीवाडीचे माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून आठ जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केलंय.

तर अन्य जखमी इतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात पाठवण्यात आले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version