पालघर : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी देविदास ठाकरे याच्याविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेचा एका खासगी रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात झाल्याचाही आरोप असून, संबंधित डॉक्टरची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांची संमती न घेता गर्भपात केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात संबंधित डॉक्टरवरही कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.