राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे केंद्र सरकारने नवे अनलॉक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये येत्या ४ मार्चपासून नाट्यगृह, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. तर इतर जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या १४ जिल्ह्यांमध्ये ४ मार्चपासून कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
राज्यातील सरकारी, खासगी कार्यालये १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी.
शाळा पूर्ण क्षमतेने सुरू.
रेल्वे, बसने प्रवास करताना कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधकारक.
मॉल्स, चित्रपटगृहे आणि इतर ठिकाणी कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक.
मनोरंजन, जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरू.
लग्नसमारंभावरील अटी हटवण्यात आल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.