त्याने132 वाहने चोरली म्हणून काय झालं? आपले पोलिसही चोरांसाठी ठरले सव्वा शेर

त्याने132 वाहने चोरली म्हणून काय झालं? आपले पोलिसही चोरांसाठी ठरले सव्वा शेर

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

 

एखाद दुसऱ्या वाहन चोरीच्या घटना आपल्या आजुबाजुला घडत असतात. मात्र, कोणी म्हटलं की एखाद्यानं 132 गाड्या चोरल्या तर आपल्याला आश्चर्यच वाटेल.

मात्र, पिंपरीतील एका चोरट्यानं चक्क 132 वाहनांची चोरी केलीय. म्हणजे हा चोर नक्कीच सराईत होता यात काही शंका नाही. पण आपले पोलिसही या शेर चोरांसाठी सव्वा शेर ठेरलेत. पोलिसांनी या सराईत दुचाकी चोरट्याला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवून अटक केली.

पोलिसांनी या चोरट्याकडून 64 वाहनं हस्तगत केली आहेत. गुन्हे शाखा युनिट 2 ची ही कौतुकास्पद कामगिरी असल्याचं म्हटलं जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version