Bhiwandi News : खेळताना तोल जाऊन नाल्यात पडला, पावसाच्या प्रवाहात वाहून गेला; भिवंडीत 13 वर्षांचा मुलगा बेपत्ता

Bhiwandi News : खेळताना तोल जाऊन नाल्यात पडला, पावसाच्या प्रवाहात वाहून गेला; भिवंडीत 13 वर्षांचा मुलगा बेपत्ता

भिवंडी : भिवंडीत मागील दोन दिवसात पाण्यात बुडून दहा वर्षांच्या दोन जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी एका 13 वर्षीय मुलाचा नाल्याच्या पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद अबुजर अन्सारी असे बेपत्ता मुलाचे नाव आहे. पालिका आपत्कालीन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अबुजार हा देऊ नगर येथे राहणारा मुलगा आपल्या मित्रांसोबत काकूबाई चाळ परिसरातील नाल्याजवळ खेळत होता. तेथे तोल जाऊन नाल्यात पडल्याने तो पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी पालिका आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी जोरात वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्यात बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा : Nashik Cloudburst Warning : ढगफुटीसदृश्य पावसासाठी प्रशासन सज्ज; मध्यरात्रीच 100 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पोलीस तैनात, अधिकारी अलर्ट

दरम्यान, शनिवारी म्हाडा कॉलनी येथील 10 वर्षीय आतिफ शेख हा कचरा टाकायला गेला असता कामवारी नदीत पडल्याने बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याच परिसरात सापडला. त्यानंतर रविवारी सायंकाळी चाविंद्रा येथील कामवारी नदीत खेकडे पकडण्यासाठी गेलेला मोहम्मद गैस (वय 17) हा पाण्यात पोहोण्यासाठी गेला असता तो नदीपात्रात वाहून गेला. त्याच्या मृतदेहाचा शोध 24 तासांनंतरही लागला नसून त्यासाठी पालिका अग्निशामक दलासोबत आपत्कालीन कक्षाचे पथक संपूर्ण खाडी पात्रात शोध घेत आहेत. तर आता शहरात ही तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version