सदावर्ते दांपत्य सहकार खात्याचा मोठा दणका

सदावर्ते दांपत्य सहकार खात्याचा मोठा दणका

मुंबई, ८ मे २०२४, प्रतिनिधी : वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. सदावर्ते दांपत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत अशाही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररीत्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे. एस टी बाहेरच्या लोकांना बॅंकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हे सदावर्त्यांना सहकार खात्याने दाखवून दिले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीररीत्या जे काही ठराव पास झाले होते. ते सर्व ठराव स्थगित करून सहकार खात्याने चांगली चपराक सदावर्ते कुटुंबीयांना दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version