वीज ग्राहकांची ७ कोटींची थकबाकी

वीज ग्राहकांची ७ कोटींची थकबाकी

सातारा, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : महावितरणच्या भरारी पथकाने शहरातील थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली असून, आज, मंगळवारी १५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर खडबडून जागे झालेल्या काही वीज ग्राहकांची थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची धावाधाव दिवसभर सुरू होती. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे अकरा दिवस उरले असून, महावितरणला १ लाख ९ हजार घरगुती ग्राहकांकडून थकबाकीपोटी तब्बल ७ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने वसुली मोहिमेला गती दिली असून, वारंवार कल्पना देऊनही वीजबिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासाठी महावितरणने सातारा शहरातील पाच विभागांसाठी सात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version