एस.टी कामगारांसाठी आनंदाची बातमी

एस.टी कामगारांसाठी आनंदाची बातमी

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एस टी कामगारांना देण्यात येणारा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या अर्थ विभागाच्या सचिवांनी बैठक बोलावली आहे. बऱ्याच दिवसांपासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता वाढ करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने ४ टक्के भत्ता वाढवून दिला आहे. महागाई भत्ता वाढवून राज्य सरकारने एस.टी कामगारांना आनंदाची बातमी दिली आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version