पालघरमध्ये विद्यार्थी घेतायत उघड्यावर शिक्षण

पालघरमध्ये विद्यार्थी घेतायत उघड्यावर शिक्षण

डहाणू, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : डहाणू तालुक्यातील आंबेमोरा येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या प्राथमिक शाळेत 49 विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या शाळेतील एक वर्ग खोली धोकादायक असल्याने तोडून जमीनदोस्त करण्यात आली . तर दुसऱ्या वर्ग खोलीच्या दुरुस्तीच काम मागील महिनाभरापासून हाती घेण्यात आल आहे. मात्र मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच नसल्याने हे चिमुकले विद्यार्थी मागील महिनाभरापासून जंगला शेजारी एका झाडाखाली शिक्षणाचे झाडे गिरवत आहेत . त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version