कोल्हापूर, ८ जानेवरी २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूरचा लाल मातीचा कुस्ती आखाडा हा जगभर प्रसिद्ध. याच कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे खरंतर पैलवान आहेत. खासदार महाडिक यांचे वडील भीमराव दादा महाडिक हे देखील पैलवान होते. खासदार महाडिक यांची मुलंही पैलवान आहेत. आता खासदार धनंजय महाडिक यांचा नातू आणि महाडिक यांची चौथी पिढी लाल मातीत उतरली आहे. अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक हा चिमुकला भीमा केसरी कुस्ती आखाड्यात सहज वावरताना दिसला. लहानगा चिमुकला लाल मातीत बागडताना पाहून अनेकांना कौतुक वाटले. विशेष म्हणजे यावेळी पैलवानांपेक्षा जास्त चिमुकल्या अमरेंद्रची चर्चाच अधिक झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.