थंडीमुळे विठ्ठलास उबदार पोशाख

थंडीमुळे विठ्ठलास उबदार पोशाख

पंढरपूर, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या कानावर कानपट्टी तर अंगावर मऊ रेशमी काश्मिरी शाल परिधान करण्यात आली. कार्तिकी वारीनंतर थंडीचा उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली. विठ्ठलास फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या वसंत पंचमी पर्यंत असा पोशाख परिधान केला जाईल. ऋतूनुसार आणि वातावरणीय बदलानुसार परंपरेप्रमाणे विठ्ठलास पोशाख परिधान केले जातात. याचाच भाग म्हणून कानावर कानपट्टी तर अंगावर शाल थंडीपासून बचाव करण्यासाठी विठ्ठलास देण्यात आली आहे.

विठ्ठलाच्या कानावर कानपट्टी तर अंगावर काश्मिरी शाल

अडीच महिने असणार उबदार पोशाख

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version