स्वच्छतेसाठी अभिनव उपक्रम

स्वच्छतेसाठी अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिक दुचाकीवर येऊन कचरा फेकून निघून जातात. महापालिकेने हे प्रकार थांबविण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. मात्र, यश मिळाले नाही. रात्री-अपरात्री उघड्यावर कचरा फेकू नका. महापालिकाच २५ ठिकाणी कचरा स्वीकारणारे केंद्र उभारणार आहे. नागरिकांनी शक्यतो वर्गीकरण करून कचरा द्यावा. प्रत्येक केंद्रावर मनपाचा एक कर्मचारी असेल. इंदूरपेक्षा छत्रपती संभाजीनगर स्वच्छ व्हावे यासाठी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी विविध प्रयोग केले. नागरिकांना दंडही लावला. ८५ टक्के कचरा घंटागाड्यांद्वारे येतो. काही नागरिकांना घंटागाडीची वेळ योग्य वाटत नसेल, घंटागाडी अरुंद गल्लीत येतच नसेल किंवा संबंधित नागरिक उशिरा उठत असतील तर ते आपला कचरा कोठेही नेऊन फेकतात.महापालिकेने आता कचरा आम्हाला द्या’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ठिकाणी कचरा संकलन केंद्रे तयार केली जातील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version