जालना, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर १७ व्या दिवशी मागे घेतले आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे.
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगेंनी ही घोषणा केल्यानंतर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात पोहोचले. त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा केली, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री शिंदे यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.