चक्क मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

चक्क मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील मंत्रालायत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचंही धमकीच्या कॉलमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर आता अहमदनगर पोलिसांनी संबंधित आरोपीला तातडीने अटक करत त्याची चौकशी सुरू केली आहे. बाळकृष्ण ढाकणे असं आरोपीचं नाव असून तो शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील रहिवासी आहे. आरोपीने गुरुवारी म्हणजेच काल ११२ नंबरवर फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती.

आरोपीने धमकी देताच मुंबई पोलिसांनी तातडीने मंत्रालयात धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला मंत्रालयात पाचारण करण्यात आलं. परंतु संपूर्ण मंत्रालयाची पाहणी केल्यानंतर कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर शेवगाव पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण ढाकणे याला अटक केली आहे. परंतु आरोपीने पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धमकीचा फोन केल्यानंतर त्याला पाथर्डी पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. दारुच्या नशेत हे आरोपीने धमकी दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आरोपी बाळकृष्ण ढाकणे हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून तो सतत ११२ नंबरवर फोन करून मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा आग्रह धरत होता. परंतु १५ दिवसांनंतर पुन्हा फोन करत मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं नाही तर मंत्रालय उडवून देण्याची धमकीच आरोपी बाळकृष्ण याने दिली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत आरोपीला शेवगावातून अटक केली आहे. त्यानंतर आता आरोपीची संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच मुंबईतील मंत्रालय परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version