‘संजय राऊतांचं डोकं फिरलंय’

‘संजय राऊतांचं डोकं फिरलंय’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. याप्रकरणी तक्रार दाखल करताना संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचं नाव जबाबात नोंदवलं आहे.मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्लानंतर शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पण हल्लेखोरांवर किंवा संशयितांवर बोलण्यावर मात्र त्यांनी टाळलं आहे. प्रकरण तपासाधीन असल्याचं सांगत त्यांनी कुणाचेही थेट नाव घेणं टाळलं आहे. पण शिवाजी पार्क मैदान परिसरात स्टंप घेऊन हल्ला करणारे कोण हे आम्हांला ठाऊक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होतं की, मी यांना ओळखत नाही. जर शिवसेनेने हल्ला केला असता तर ते कोमामध्ये असते. यावर देशपांडे बोलत असताना म्हणाले की, संजय राऊत यांच मानसिक संतूलन बिघडलं आहे… यापूर्वीही मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांना माझी सहानुभूती आहे. त्यांच्यावर उपचार करायला हवेत. उद्धव ठाकरे हे तर मोठे डॉक्टर आहेत. त्यांचा सल्ला तर जागतिक आरोग्य संघटना पण घेते. माझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्या बिचाऱ्यांचा काय दोष आहे. ज्यांनी हे केलं केल आहे त्यामागचा खरा सुत्रधार लवकरच समोर येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version