जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या पंचधातूच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते त्यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आजच्या बंजारा समाजाची परिस्थिती फारशी चांगली नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तांड्याचा जो आरखाडा आखलेला आहे. तो शंभर टक्के पूर्ण करू, विकास हा त्या तांडयापर्यंत आणू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘नाॅन क्रिमिनलची मागणी ही योग्य आहे. पण ती तपासून घ्यावी लागेल. नाॅन क्रिमिनल न लावण्याची मागणी ही तपासून त्या मागण्याची घोषणा करू. वर्धा वाशिम रेल्वे योजना मंजूर केली आहे. आता पोहरा गावातही रेल्वे येईल आणि या परिसराता विकास होईल, ‘बंजारा समाजासाठी एक महामंडळही सुरू केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत. आम्ही ती तिजोरी मी बंजारा विकासासाठी खुली करू. बंजारा समाजाच्या गोड बोलीचं संवर्धनही सरकार करेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.endf
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.