बगदाद बॉम्बस्फोटाने हादरलं, 10 जणांचा जागीच मृत्यू

बगदाद बॉम्बस्फोटाने हादरलं, 10 जणांचा जागीच मृत्यू

वृत्तसंस्था, इराक

 

इराकची राजधानी असलेलं बगदाद शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाल्याची माहिती समजत आहे.

 

एका कारमध्ये हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या हल्ल्यात बगदादमधील एका प्रसिद्ध आईस्क्रिम दुकानाला टार्गेट करण्यात आलं होतं.

 

दरम्यान, या बॉम्बस्फोटाची आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version