Chandrashekhar Bawankule : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंसोबत 14 ठिकाणी भाजपची युती नाही’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं कारण

Chandrashekhar Bawankule : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंसोबत 14 ठिकाणी भाजपची युती नाही’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं कारण

परभणी : येत्या चार दिवसांत राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महायुतीची सत्ता असून महाआघाडी ही विरोधात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी बहुतांश ठिकाणी युतीची समीकरणं बदललेली पाहायला मिळत आहेत. महायुतीत असलेली भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी विविध ठिकाणी युती बदलून लढत आहेत. यासंदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा परभणीत प्रश्न विचारला असता त्यांनी वेगवेगळे लढत असलो तरी राज्यात महायुतीचं सत्तेत येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिंदे गटासोबत भाजपने 15 ठिकाणांवर युती केली असून 14 ठिकाणी ही युती झालेली नाही. त्यामुळे सत्तेत एकत्र बसणाऱ्य पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय समीकरण जुळत नसल्याचे यातून स्पष्ट होते. 

हेही वाचा : NCP Candidate Amol Balwadkar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; पुण्यातील उमेदवाराचा कुख्यात गुंडासोबतचा व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version