Nagpur Mahapalika Election : नागपुरात भाजपचा ‘पॉवर प्ले’! 143 उमेदवारांची घोषणा; RSS मुख्यालय असलेल्या रेशीमबागची जागा शिंदे-सेनेला

नागपूर महापालिका निवडणुकीत महायुतीचे समीकरण अखेर स्पष्ट झाले आहे. येथे भाजपने अनेक अनुभवींना मागे ठेवून तरुणांना संधी देण्याची भूमिका ठेवली आहे.
Nagpur Mahapalika Election : नागपुरात भाजपचा ‘पॉवर प्ले’! 143 उमेदवारांची घोषणा; RSS मुख्यालय असलेल्या रेशीमबागची जागा शिंदे-सेनेला

Nagpur Mahapalika Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड असलेल्या नागपुरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, भाजपने आपली पहिली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली आहे. 'एबी' (AB) फॉर्मचे आधीच वाटप झाल्यानंतर पक्षाने आता 143 उमेदवारांची नावे सार्वजनिक केली आहेत. या यादीतून भाजपने तरुणांना संधी देत प्रस्थापित राजकारण्यांना धक्का दिल्याचे दिसून येत आहे.

रेशीमबागच्या जागेवर शिवसेनेचा भगवा?
नागपूर महापालिका निवडणुकीत महायुतीचे समीकरण अखेर स्पष्ट झाले आहे. यातील सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय ज्या भागात आहे, ती 'रेशीमबाग'ची जागा भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सोडली आहे. एकूण 151 जागांपैकी भाजप 143 जागांवर लढणार असून, मित्रपक्षांसाठी केवळ 8 जागा सोडण्यात आल्या आहेत.

युतीचा पेच आणि जागांचे गणित
महायुतीमध्ये जागावाटपाचा गुंता सोडवण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. शिवसेनेने प्रभाग 21 आणि 24 मधील अतिरिक्त दोन जागांसाठी आग्रह धरला होता, मात्र अखेर 8 जागांवरच तडजोड झाली आहे. दुसरीकडे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात 'स्वबळाचा' नारा देत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – BMC Election 2026: मागाठाण्यात एका जागेसाठी 5 तास खलबत! एकीकडे घराणेशाहीचा जोर; दुसरीकडे निष्ठावंतांच्या अपेक्षांवर पाणी

24 वर्षांच्या इंजिनिअर तरुणीला उमेदवारी
भाजपने या निवडणुकीत अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांना मागे ठेवून तरुण रक्ताला संधी दिली आहे. प्रभाग 24 मध्ये पक्षाने अवघ्या 24 वर्षांच्या दुर्गेश्वरी कोसेकर या उच्चशिक्षित सिव्हिल इंजिनिअर तरुणीला मैदानात उतरवले आहे. दुर्गेश्वरी ही नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील भाजपची सर्वात तरुण उमेदवार ठरली असून, तिच्या उमेदवारीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

अनुभवाऐवजी तरुणाईवर विश्वास
वरिष्ठ नेत्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन भाजपने मतदारांना बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः ज्या प्रभागांमध्ये अनेक वर्षांपासून प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व होते, तिथे भाजपने तरुण उमेदवारांना पसंती दिली आहे. यामुळे नागपूरच्या राजकारणात एक नवी पिढी उदयाला येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – PMC Election: अजित पवारांना गुन्हेगारीमुक्तीच्या दाव्याचा विसर? मारणेनंतर आता आंदेकर टोळीच्या दोन महिलांना राष्ट्रवादीचे तिकीट 

नागपूर महानगर पालिकेत विविध पक्ष लढवत असलेल्या जागा
भाजप- 143
शिव सेना (शिंदे)- 8
राष्ट्रवादी (अजित पवार) – 94
काँग्रेस – 141
उबाठा – 10
राष्ट्रवादी (शरद पवार) – 64
मनसे – 15
MIM – 3 जागा (आकडा अद्याप अपूर्ण)
बसपा – 8 (आकडा अद्याप अपूर्ण)
वंचित – 45 जागा
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version