Joint Care in Winter : हिवाळ्यात सांधेदुखी वाढण्याचं कारण आहार, वय की आणखी काही? हे उपाय देतील आराम

जसजसे तापमान खाली जाते, तसतसे गुडघे, कंबर, खांदे आणि जुन्या दुखापतींच्या ठिकाणी पुन्हा वेदना सुरु होतात. अनेकदा याचे कारण लक्षात येत नाही.
Joint Care in Winter : हिवाळ्यात सांधेदुखी वाढण्याचं कारण आहार, वय की आणखी काही? हे उपाय देतील आराम

Joint Pain and Care in Winter : हिवाळ्यातील (Cold Weather) थंडगार हवा सुरु होताच, शरीराच्या अनेक भागांवर परिणाम जाणवतो, पण सर्वात जास्त त्रास होतो तो सांधेदुखीचा. अनेक लोकांना सुरुवातीला हलक्या वेदना (Mild Pain) होतात, पण जसजसे तापमान खाली जाते, तसतसे गुडघे (Knees), कंबर (Waist), खांदे (Shoulders) आणि जुन्या दुखापतींच्या (Old Injuries) ठिकाणी पुन्हा वेदना सुरु होतात. अनेकदा लोक या त्रासाला फक्त वाढते वय (Aging) किंवा शारीरिक कमजोरी (Weakness) मानतात, परंतु यामागे शास्त्रीय कारणे (Joint Pain Scientific Reasons) दडलेली आहेत.

वेदना वाढण्याची प्रमुख कारणे
थंडी वाढली की शरीरातील रक्तवाहिन्यांचे (Blood Vessels) आकुंचन होते, ज्यामुळे शरीरात रक्तप्रवाह (Blood Flow) मंदावतो. रक्त व्यवस्थित न पोहोचल्यामुळे सांध्यांची लवचिकता (Flexibility) कमी होते आणि ते ताठ (Stiff) आणि जास्त वेदनादायक (Painful) वाटू लागतात. त्यामुळे अनेकदा थंडीमुळे आपले शरीर गोठत चालले आहे, असे वाटते. याशिवाय, जुने फ्रॅक्चर (Fractures) किंवा दुखापत झालेले सांधे हिवाळ्यात अधिक संवेदनशील (Sensitive) होतात. तापमान कमी होताच त्या ठिकाणी सूज (Swelling), वेदना आणि कडकपणा (Stiffness) अधिक जाणवू लागतो. त्यामुळे थंडीचा काळ आराम नव्हे, तर सावधगिरी (Caution) घेऊन येतो.

हेही वाचा – Winter Health Tips: हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 'हे' सात पदार्थ; जाणून घ्या

सांधेदुखीवर प्रभावी उपाय
या त्रासातून आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात:

शरीर ठेवा उबदार (Keep Warm): थंडीत सांध्यांचा कडकपणा वाढू नये, म्हणून शरीर उबदार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. लेयरमध्ये कपडे, मोजे, टोपी आणि ग्लव्ज वापरून शरीराचे तापमान योग्य ठेवा. घरात बसल्यावर हीटिंग पॅड (Heating Pad), चटई किंवा गरम सिकाई (Hot Compress) वापरल्यास सांध्यातील जकडण कमी होते. खोलीचे तापमान खूप थंड ठेवणे टाळा.

हलकी हालचाल आणि व्यायाम (Exercise and Movement): थंडीत अनेकजण आळसामुळे कमी हालचाल करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह अधिक कमी होऊन सांधेदुखी वाढते. सांध्यांतील लवचिकता वाढवण्यासाठी हलकी स्ट्रेचिंग (Stretching), योग (Yoga) किंवा थोडा वेगाने चालणे गरजेचे आहे. एकाच जागी खूप वेळ बसल्यास 'stiffness' वाढते, म्हणून मधेमधे उठून थोडे चालणे आवश्यक आहे.

पौष्टिक आहार (Nutritious Diet) : सांध्यांसाठी उपयुक्त असा पौष्टिक आहार घेणे, फळे खाणेदेखील आवश्यक आहे. तसेच, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात तहान कमी लागेत. शिवाय, पाण्याचं तापमान कमी झाल्यामुळे जास्त पाणी प्यावसं वाटत नाही. अशा वेळेस कमी पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी पिणे चांगले.

हेही वाचा – Winter Health Tips: या हिवाळ्यात ट्राय करा ‘या’ 5 प्रकारच्या हर्बल टी; शरीर राहील गरम आणि इम्युनिटी होईल डबल स्ट्राँग 

(Disclaimer :  ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version