डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपकडून अमरावतीत बुधवारी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना मविआ सरकारवर बरसले आहेत.
‘अडीच वर्ष सरकार बंदिस्त होतं, दाराआड होतं, माविआ सरकार फेसबुक वर लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं’, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. ‘अडीच वर्षांत मविआने वसुलीचे उच्चांक गाठले’, असं म्हणत फडणवीसांनी मविआ सरकारवर खोचक टीका केली आहे.
‘मविआ सरकारमध्ये वर्क फ्रॉम जेलही पाहायला मिळालं’, असं म्हणत त्यांनी मविआच्या नेत्यांवर निशाणा साधला. ‘तुरुंगातील नेत्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत आणि नैतिकता मविआ सरकारमध्ये नव्हती’, असाही त्यावेळी फडणवीस म्हणाले.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.