पंढरपूर :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल – रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. पंरपरेला अनुसरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक महापूजा केली. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिरातील विणेकर शिवदास सोलते आणि इंदुबाई कोलते या दाम्पत्याला महापूजा करण्याचा मान मिळाला.
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.