नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैश ए मोहमद बँड टेरेरिस्ट संघटनेने रेकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जैशकडून महत्त्वाच्या ठिकाणी रेकी केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस सज्ज झाले असून पोलिसांनी संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश ए मोहम्मदकडून रेकी केली जाणे, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा योग्य खबरदारी घेतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना व्यक्त केला आहे.
नागपूर आर.एस.एस. हेड क्वार्टर, हेडगेवार स्मारकसारख्या महत्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतील परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १७३ कलम १४४ (१),(३)प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.