नितेश राणे यांना शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांची नोटीस

नितेश राणे यांना शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांची नोटीस

सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीकरता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते.

संतोष परब यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, यात भाजप आमदार नितेश राणे व जि. प. अध्यक्ष संजना सावंत याचे पती गोट्या सावंत यांची नावे जबाबामध्ये दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावली आहे.

दरम्यान आमदार नितेश राणे यांनी नोटीस प्रकरणी पोलिसांना जबाब दिला आहे. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच असे असूनही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले असल्यामुळे त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version