राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने ८ जानेवारी रोजी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारचे नवे आदेश १ फेब्रुवारी लागू होणार आहेत.
उद्याने आणि इतर पर्यटनस्थळे खुली करण्यास परवानगी.
केशकर्तनायल, स्पा सेंटर्स ५० टक्के क्षमतेने सुरू होणार.
स्वीमिंग पूल आणि वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी.
रेस्टॉरंट, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू होणार.
विवाह समारंभासाठी २५ टक्के क्षमता तसेच जास्तीत जास्त २० नागरिकांची उपस्थिती बंधनकारक.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.