केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अर्ज अमान्य केला आहे. जुहू येथील अधिश बंगल्याबाबत नारायण राणे यांनी अर्ज केला होता. अधिश बंगल्यातील अनियमितता नियमबद्ध करण्याची विनंती राणे यांनी केली होती. मात्र, त्यांचा अर्ज अमान्य करण्यात आला आहे.
२०१७मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई पालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. दरम्यान, अधिश बंगल्यातील अनियमितता नियमबद्ध करण्याची विनंती करण्याचा अर्ज नारायण राणे यांनी केला होता. मात्र, त्यांचा अर्ज अमान्य केला आहे.
तसेच, महानगर पालिकेने जी नोटीस पाठवली आहे, ती सूडबुद्धीने पाठवली आहे. मुंबईतील ९० टक्के बांधकाम बेकायदेशीर आत. मातोश्रीजवळील अनेक बांधकाम बेकायदेशीर असून मातोश्रीजवळील बेहरामपाडा पूर्ण बेकायदेशीर आहे. मात्र, तिथे हातोडा टाकायची सरकारची हिंमत नाही, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच आमचं घर दिसत मात्र, भोंग्यावर कारवाई करण्याची यांची हिंमत नाही, असे राणे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.