भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता याप्रकरणी अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
भाजप आमदार नितेश राणे आज सत्र न्यायालयासमोर हजर झाले. दरम्यान, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. सरकारी वकिलांनी नितेश राणे शरण आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच राणेंच्या वकिलांनी सरकारी वकिलांचा मुद्दा खोडून काढला. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना १० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेसाठी आमच्याकडे वेळ आहे, असा युक्तीवाद राणेंचे वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे.
त्यामुळे आता भाजप आमदार नितेश राणे यांना जेल की बेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.