Coconut & Castor Oil : मुलायम आणि मजबूत केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर? नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल? जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा केसांची निगा योग्यप्रकारे न राखल्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या केसांवर होतो.
Coconut & Castor Oil : मुलायम आणि मजबूत केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर? नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल? जाणून घ्या

मुंबई: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा केसांची निगा योग्यप्रकारे न राखल्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या केसांवर होतो. त्यामुळे, अनेकजण केसांची निगा राखण्यासाठी विविध उपाय करतात. तसेच, केसांना मजबूत आणि घणदाट करण्यासाठी अनेकजण नारळाचं तेल, एरंडेल तेल किंवा इत्यादी तेलांना लावतात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, नारळाचं तेल किंवा एरंडेल तेल लावण्याचे कोण-कोणते फायदे आहेत? चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

नारळाचं तेल

केसांना नारळाचं तेल लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. यासह, केसांच्या मुळांना नारळाचं तेल लावल्यामुळे केसांची गळती कमी होते. तसेच, जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा सतत खाज होत असतील, तर केसांना नारळाचं तेल लावणे फायदेशीर आहे. नारळाचे तेल केसांना पोषण देते, ज्यामुळे केस मजबूत होण्यास मदत करते आणि केसांची वाढ होते. जर तुम्ही नियमितपणे नारळाच्या तेलाचा वापर केला, तर केसांची चांगली वाढ होते आणि केस घनदाट होण्यास मदत करते. 

हेही वाचा: Cow Milk VS Buffalo Milk: रात्री झोपण्यापूर्वी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे? जाणून घ्या

एरंडेल तेल 

एरंडेल तेल केसांना लावल्यामुळे केस गळती कमी होते. यासह, एरंडेल तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. नियमितपणे एरंडेल तेल लावल्यामुळे केस मजबूत होते. इतकंच नाही, एरंडेल तेलात रिकिनोलेइक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे, केसांच्या मुळांपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो. एरंडेल तेल केसांना हायड्रेटेड ठेवते. तज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही केसांना एरंडेल तेल लावणे फायदेशीर असते. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version