२५ लाख नागरिकांनी युक्रेन सोडले; संयुक्त राष्ट्रांचा दावा

२५ लाख नागरिकांनी युक्रेन सोडले; संयुक्त राष्ट्रांचा दावा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. युद्धाच्या सतराव्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू असून रशिया कीव शहर ताब्यात घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. अशातच २५ लाक नागरिकांनी युक्रेन शहर सोडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला आहे.

रशियाचे लष्करी सैन्य युक्रेनवर सतत क्षेपणास्त्र हल्ला करत आहे. युद्धाच्या सतराव्या दिवशाही रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया कीव शहरावर क्षेपणास्त्र हल्ला, गोळीबार करत आहे. शुक्रवारी रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला केला असल्याचा दावा युक्रेन सरकारने केला आहे. रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे युक्रेन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिक युक्रेन सोडत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे २५ लाख नागरिकांनी युक्रेन सोडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version