सेनेगलमध्ये भीषण अपघात

सेनेगलमध्ये भीषण अपघात

सेनेगल देशामधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. दोन बसची समोरसमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सेनेगलमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर सेनेगल देशामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

या भीषण अपघाताचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर येथील राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेगलमधील कॅफीन भागातील ग्निवी गावात राष्ट्रीय मार्ग क्रमाक १ वर घडला आहे. यातील एका सार्वजनिक बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी पहिली बस समोर येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली.

तसेच या घटनेचा तपास केला जाणार असून आगामी काळात अशा घटना घडू नयेत म्हणून रस्त्यावरील सुरक्षेसाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मॅकी शाल यांनी दिली.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version