Zomato Big Decision: झोमॅटोचा रेस्टॉरंट्सना थेट इशारा; अनेक डिशेस प्लॅटफॉर्मवरून हटवल्या, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट..

ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी झोमॅटोने ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Zomato Big Decision: झोमॅटोचा रेस्टॉरंट्सना थेट इशारा; अनेक डिशेस प्लॅटफॉर्मवरून हटवल्या, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट..

Zomato Zero Tolerance Policy: ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी झोमॅटोने ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खऱ्या दुधापासून बनवलेल्या पनीरऐवजी वनस्पती तेल आणि स्टार्चपासून तयार केलेले कृत्रिम म्हणजेच 'ॲनालॉग पनीर' किंवा 'बनावट चीज' वापरणाऱ्या रेस्टॉरंट्सवर झोमॅटोने कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. कंपनीने यासंदर्भात झिरो-टॉलरन्स पॉलिसी (Zero-Tolerance Policy) जाहीर केली असून, ज्या डिशेसमध्ये कृत्रिम पनीरचा वापर केला जातो, त्या सर्व डिशेस झोमॅटो ॲपवरून तत्काळ प्रभावाने हटवण्यास सुरुवात केली आहे.  

झोमॅटोच्या सीईओंचे स्पष्ट आदेश; रेस्टॉरंट्सना दिल्या 3 महत्त्वाच्या सूचना  
झोमॅटोचे सीईओ आदित्य मंगला यांनी स्पष्ट केले की, 'ग्राहकांना सकस, सुरक्षित आणि उत्तम दर्जाचे अन्न पुरवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.' या निर्णयांतर्गत त्यांनी सर्व रेस्टॉरंट भागीदारांना 'या' कडक सूचना दिल्या आहेत:  
– नैसर्गिक दुधाचा वापर: रेस्टॉरंट्सने कृत्रिम पनीर ऐवजी तात्काळ खऱ्या दुधाच्या पनीरचा वापर सुरू करावा.
– मेनूमधून डिशेस हटवणे: जर खऱ्या दुधाचे पनीर वापरणे शक्य नसेल, तर अशा डिशेस ॲपवरील मेनूमधून त्वरित काढून टाकाव्यात.
– पुरवठादारांची तपासणी: कच्चा माल पुरवणाऱ्या पुरवठादारांचे लेबल आणि घटकांची माहिती नीट तपासूनच माल स्वीकारावा.

हेही वाचा – Crime News : पार्टीत चिकनचे पीस जास्त खाण्यावरून वाद… आरोपीने मित्राला चाकू भोसकून संपवलं

काय आहे हे 'ॲनालॉग पनीर'? ग्राहकांची अशी व्हायची फसवणूक
अनेकदा हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समध्ये मिळणाऱ्या पनीरच्या भाज्यांमध्ये दुधाचा एक थेंबही न वापरता तयार केलेले पनीर वापरले जाते.
कसे बनते? हे कृत्रिम पनीर वनस्पती तेल (Vegetable Oil), स्टार्च, वनस्पती प्रथिने (Plant Proteins) आणि इमल्सीफायर्स एकत्र करून तयार केले जाते.
फसवणुकीचे कारण: दिसायला, स्पर्शाला आणि चवीला हे हुबेहूब खऱ्या पनीरसारखेच लागते. दुधाचे वाढते दर पाहता कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी काही रेस्टॉरंट्स खऱ्या पनीरच्या नावाखाली ग्राहकांना हे बनावट 'ॲनालॉग पनीर' खायला देत होते.

नियमांचे उल्लंघन केल्यास रेस्टॉरंट्सवर होणार ब्लॉकची कारवाई
झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार, ज्या रेस्टॉरंट्स किंवा क्लाउड किचन्सने आधीच मेनूमध्ये 'ॲनालॉग डेअरी'चा वापर होत असल्याचे जाहीर केले होते, त्यांच्या त्या डिशेस ॲपवरून पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत. यापुढेही जे हॉटेल चालक या नियमांचे पालन करणार नाहीत किंवा ग्राहकांची दिशाभूल करतील, त्यांना झोमॅटो प्लॅटफॉर्मवरून कायमचे हद्दपार (Delist) केले जाईल. या निर्णयामुळे आता ग्राहकांना आपण ऑर्डर केलेल्या अन्नाची खरी आणि पारदर्शक माहिती मिळणार असल्याने सोशल मीडियावर झोमॅटोच्या या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे.

हेही वाचा – HIV Positive Prisoners: तुरुंगांत HIV चा उद्रेक! 4 महिन्यांत 226 कैदी बाधित; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version