मनपा निवडणुकीसाठी आंबेडकर वंचित मनपासाठी कोणासोबत?

मनपा निवडणुकीसाठी आंबेडकर वंचित मनपासाठी कोणासोबत?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर नवी राजकीय जुळवाजुळव करत आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीगसोबत वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याची त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर सतर्क वंचित मनपासाठी कुणाच्या सोबत असणार आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.

पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्यपासूनच प्रचाराला सुरूवात होणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. मात्र शिवसेना युती करण्यास तयार होईल का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीला पडला आहे. दरम्यान त्यांनी एमआयएमवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला न्यायालयात मान्य होणार नाही हे राज्य सरकारला माहित होते, तरीसुद्धा राज्य सरकारने अध्यादेश काढला. त्यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आणण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version