‘बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट का पाहता’ – नवाब मलिक

‘बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट का पाहता’ – नवाब मलिक

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने खंडणी केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. असे व्यक्तव्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले. तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांवर केला आहे. मलिकांनी केलेले आरोप म्हणजे लवंगी फटाका त्यामुळे आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीसांनी मलिकांना दिला. म्हणून बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट का पाहत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच वानखेडे महागड्या वस्तू वापरत असल्याचा आरोपही मलिकांनी  समीर वानखेडे यांच्यावर केला आहे.

  दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे. त्यामुळे बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट का पाहत आहेत असे मलिक म्हणाले. तसेच माझे अंडरवर्ल्डसोबत काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. क्रुझपार्टीवरील कारवाई हे एक षडयंत्र आहे. समीर वानखेडेंनी मालदीवमध्येही वसुली केली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला आहे.

  वानखेडे कुटुंब महागड्या वस्तू वापरत असल्याचे मलिक म्हणाले. समीर वानखेडे सत्तर हजाराचे शर्ट वापरतात तर दोन लाख रुपयांचे बुट वापरतात. तसेच एक लाख रुपयांची पॅंट वानखेडे वापरतात. आणि वानखेडेंच्या मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ असते. त्यामुळे वानखेडे इतक्या महागड्या वस्तू वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version