‘भाजप आमदारांचे निलंबन कधी हटणार?’ – राम कदम

‘भाजप आमदारांचे निलंबन कधी हटणार?’ – राम कदम

भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान आमदारांना ६० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित करणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांचे निलंबन हे संविधानाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे सांगितले आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

५९ दिवसांपेक्षा अधिक निलंबन हे बडतर्फ करण्यापेक्षाही भयानक असल्याचा घणाघात भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. तसेच निलंबन हे फक्त ५९ दिवसांचेच असू शकते अशी प्रतिक्रिया देत, भाजपच्या आमदारांचे निंलबन कधी हटणार? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

राम कदम म्हणाले, महाराष्ट्र सरकारने राजकीय सूडापोटी आमच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले. मात्र कोणत्याही आमदाराला ५९ दिवसांपेक्षा अधिकचे निलंबन हे निलंबन नसून बडतर्फ केल्यासारखे असल्याचे ते म्हणाले. तसेच संविधानाच्या नियमांची पायमल्ली केले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे संविधानाच्या नियमांची पायमल्ली करणे चुकीचे असेल तर आपण १२ आमदारांचे निलंबन कधी रद्द करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


        

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version