Whatsapp : महत्त्वाचे! एका क्षणात बंद होऊ शकतं तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट, कारण…

काही प्रकारच्या कृतींमुळे मेटा तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट तात्पुरते निलंबित करू शकते किंवा कायमस्वरूपी बंदही करू शकते.
Whatsapp : महत्त्वाचे!  एका क्षणात बंद होऊ शकतं तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट, कारण…

आजच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप असते. वैयक्तिक गप्पांपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी या अॅपचा वापर केला जातो. मात्र, व्हॉट्सअॅप वापरताना कंपनीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे खाते धोक्यात येऊ शकते. काही प्रकारच्या कृतींमुळे मेटा तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट तात्पुरते निलंबित करू शकते किंवा कायमस्वरूपी बंदही करू शकते.

 अनधिकृत WhatsApp ॲप्सचा वापर टाळा

अनेकांना अधिक फीचर्स मिळावीत म्हणून GB WhatsApp, WhatsApp Plus किंवा इतर मॉडिफाईड व्हर्जन वापरण्याची सवय असते. मात्र, हीॲप्स अधिकृत नसून मेटाच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा ॲप्सचा वापर आढळल्यास संबंधित खाते बंद केले जाऊ शकते. सुरक्षिततेसाठी नेहमी Google Play Store किंवा Apple App Store वरील अधिकृत WhatsApp ॲपच डाउनलोड करावे.

 सतत मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणे

एकाच वेळी शेकडो लोकांना सारखेच मेसेज पाठवणे किंवा वारंवार ब्रॉडकास्ट करणे ही स्पॅमसदृश कृती मानली जाते. अशा हालचाली सिस्टमच्या नजरेत आल्यास खाते संशयास्पद म्हणून चिन्हांकित होऊ शकते आणि त्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढते.

 अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती शेअर करणे

सोशल मीडियावर फिरणारे प्रत्येक मेसेज किंवा बातमी खरी असेलच असे नाही. कोणतीही माहिती पडताळणी न करता वारंवार फॉरवर्ड केल्यास ती चुकीची माहिती पसरवल्याच्या श्रेणीत येऊ शकते. अशा प्रकारच्या गैरवापरामुळे व्हॉट्सॲप संबंधित खात्यावर निर्बंध लागू करू शकते.

 आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर मजकूर प्रसारित करणे

हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा, द्वेष पसरवणारा, अश्लील किंवा कायद्याने प्रतिबंधित मजकूर, फोटो अथवा व्हिडीओ शेअर करणे गंभीर नियमभंग मानला जातो. अशा प्रकारचा कंटेंट आढळल्यास खाते बंद होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.

 खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?

व्हॉट्सॲप वापरताना केवळ अधिकृत ॲपचा वापर करा, संशयास्पद लिंक किंवा फाइल्स उघडणे टाळा, मोठ्या प्रमाणात स्पॅम मेसेज पाठवू नका आणि कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा. या साध्या गोष्टींचे पालन केल्यास तुमचे व्हॉट्सॲप खाते सुरक्षित राहण्यास मदत होईल.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version