Guru Purnima 2026 : गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Guru Purnima 2026 : गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यात ज्ञान देणाऱ्या गुरूंचा आणि आचार्यांचा आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण आहे. हा सण हिंदू पंचांगातील आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. म्हणून याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. गुरू पूजन करण्यासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. 

हेही वाचा : Shani Vakri 2026: शनीची वक्री चाल सुरू! 'या' 5 राशींवर संकटाचे सावट; काय करावं आणि काय टाळावं?

महत्त्व आणि इतिहास – 

व्यास पूजन : महाभारत, 18 पुराणे आणि वेदांचे वर्गीकरण करणाऱ्या महर्षी वेद व्यासांना या दिवशी वंदन केले जाते. महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात कारण त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली. त्यांचा जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दवैपायन असे संबोधिले जाते. त्यांनी स्पर्श केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरू स्थानी मान दिला जातो.

आदिनाथ शिवाचे प्रकटन : योग परंपरेत भगवान शंकराने (आदियोगी) याच दिवशी आपल्या सप्तर्षी शिष्यांना पहिली दीक्षा दिली आणि ते जगातील पहिले 'आदिगुरू' बनले.

बौद्ध व जैन परंपरा : गौतम बुद्धांनी या दिवशी सारनाथ येथे पहिले उपदेश दिले होते. तर जैन धर्मात महावीर स्वामींना पहिला अनुयायी मिळाला होता. आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धाने सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस गुरू पौर्णिमेचा होता असे मानले जाते. त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे.

सजावट आणि पूजेचे स्वरूप – 

गुरूंची पूजा : शिष्यांकडून आपल्या आध्यात्मिक किंवा शैक्षणिक गुरूप्रति फुले, श्रीफळ व वस्त्र अर्पण करून पूजा केली जाते.

सद्भावना व कृतज्ञता : 'गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः' या श्लोकाचे स्मरण करत जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त केला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version