मुंबई, ७ मे २०२३, प्रतिनिधी : ओटीटी माध्यमांमुळे सध्या वेब सगळ्यांना सिरीज पाहण्याचं वेड लागलं आहे. दरम्यान कोरियन, जपानी वेब सिरिजनि जरा जास्तच वेड लावलं आहे. अशातच अनेकांना असे वाटते की जपानी मुलींसारखी आपली त्वचा असावी. जपानी आणि कोरियन महिला आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेवेगळ्या प्रक्रिया करत असतात. चला तर जाणून घुएया त्यांच्या सौंदर्याचं रहस्य.
तांदळाच्या पाण्यात अमिनो ऍसिडस् असतात. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे समृद्ध तांदळाचे पाणी केसांसाठीच नाही तर त्वचेची निगा राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.यासाठी फक्त तांदूळ रात्रभर भिजवून ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर याच पाण्यानं तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा. हा उपाय केल्याने टॅनिंग, काळे डाग आणि सनबर्नच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
जपानी महिलांचा आहार हा त्यांच्या सुंदरतेचं रहस्य आहे .जपानी महिला मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या, फळतसेच मासे खातात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट, ई- जीवनसत्त्व आणि ओमेगा-३ मिळतं. त्यामुळे चार चमकदार होतो.
जपानी महिला उत्तम, त्वचेसाठी एक खास नैसर्गिक तेल वापरतात. त्यामुळे त्वचा मुलायम होते. या तेलात चंदनाचं तेल आणि लेवेंडर ऑईलने शरिराची मसाज करतात. याचबरोबर जपानी महिला एका विशिष्ठ प्रकारच्या लोशन मास्कचा देखील वापर करतात. त्यामुळे तुमचा चेहरा चमकण्यास मदत होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.