नागपुरात, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नागपुरात आगमन होणार आहे. बुधवारी सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दौऱ्यादरम्यानचे कार्यक्रम
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.