H1B Visa Fee Hike: ट्रम्प प्रशासन H-1B व्हिसा शुल्क 70 टक्क्यांनी वाढवणार? भारतीयांवर होणार थेट परिणाम

यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी तात्पुरत्या स्वरूपात लागू केलेली ही वाढ चालू वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. ती कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे.
H1B Visa Fee Hike: ट्रम्प प्रशासन H-1B व्हिसा शुल्क 70 टक्क्यांनी वाढवणार? भारतीयांवर होणार थेट परिणाम

Trump H1B Visa Fee Hike 2026: अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्याची तयारी केली असून हे व्हिसा शुल्क 1 लाख डॉलर्सहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी फेडरल रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या नव्या प्रस्तावानुसार, गृह सुरक्षा विभागाने हे शुल्क 1,03,265 डॉलर्स इतके निश्चित केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी तात्पुरत्या स्वरूपात लागू केलेली ही वाढ चालू वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. आता ही शुल्कवाढ तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी लागू करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा मानस असून यावर वर्षाच्या अखेरपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

फेडरल कोर्टाचे आव्हान आणि कायदेशीर वाद कायम
याआधी बोस्टनमधील फेडरल न्यायाधीशांनी ट्रम्प प्रशासनाने लादलेली 1 लाख डॉलर्सची शुल्कवाढ रद्द केली होती. संसदेने अशा अनधिकृत कर वाढीला मंजुरी दिली नसल्याचा ठपका ठेवत कोर्टाने आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. या निर्णयावर कोर्टात कायदेशीर वाद आणि सुनावणी सुरू असतानाच ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा ही नवीन शुल्कवाढ कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव आणल्याने आयटी, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Landslide : मोशी दुर्घटनेपेक्षाही भीषण! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर कोसळून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे बचावकार्य सुरू

70 टक्क्यांहून अधिक भारतीय व्हिसाधारकांवर थेट फटका
अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या H-1B व्हिसाधारकांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजेच 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर 12 टक्के प्रमाणासह चिनी नागरिक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 1 लाख डॉलर्सच्या या नव्या शुल्कापूर्वी या व्हिसासाठी सुमारे 2,000 ते 5,000 डॉलर्स खर्च येत होता. त्यामुळे या नवीन शुल्कवाढीचा सर्वात मोठा आणि थेट फटका भारतीय कुशल व्यावसायिक आणि आयटी कंपन्यांना बसणार आहे.

काय आहे H-1B व्हिसा कार्यक्रम?
H-1B हा अमेरिकेतील एक महत्त्वाचा गैर-आदिवासी व्हिसा कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून तेथील कंपन्या माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वित्त आणि संशोधन क्षेत्रातील परदेशी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवतात. यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) द्वारे संचलित हा व्हिसा 6 वर्षांच्या कालावधीसाठी दिला जातो. अमेरिका दरवर्षी 65,000 सामान्य व्हिसा आणि उच्च पदवीधारकांसाठी अतिरिक्त 20,000 व्हिसा मंजूर करते.

हेही वाचा – Oman Accident: परदेशात भारतीयांवर काळाचा घाला; तांत्रिक बिघाडामुळे वाहन उलटलं; 1 जणाचा मृत्यू, 9 जखमी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version