IND vs NZ T20 World Cup: वर्ल्ड कप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर, चिंता वाढली; पण ‘त्या’ 3 अडथळ्यांचं पुन्हा टीम इंडियासमोर आव्हान

आज रविवार 8 मार्चला टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. अंतिम सामन्यात विजयी होण्यापूर्वी टीम इंडियाच्या मार्गात 3 अडथळे आले आहेत. 
IND vs NZ T20 World Cup: वर्ल्ड कप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर, चिंता वाढली; पण ‘त्या’ 3 अडथळ्यांचं पुन्हा टीम इंडियासमोर आव्हान

आज रविवार 8 मार्चला टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात संध्याकाळी 7 वाजता लढवला जाणार असून हा हायवोल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाला लाखो चाहत्यांसमोर मायदेशी इतिहास रचण्याची संधी आहे. यादरम्यान दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले असून टीम इंडियातील खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे साऱ्या देशाचं आणि क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. दरम्यान अंतिम सामन्यात विजयी होण्यापूर्वी टीम इंडियाच्या मार्गात 3 अडथळे आले आहेत. 

हेही वाचा- T20 World Cup 2026: 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'साठी 'या' 8 संघांमध्ये चुरस; यादीत भारताचा फक्त एक खेळाडू, तर इतर संघातील…
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील टीम इंडियाचं लक
2023 ला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. हा पराभव टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी इतका वेदनादायक होता की, ज्याची सल टीम इंडिया आणि चाहत्यांना अजूनही जाणवते. यापूर्वीही टीम इंडिया अनेक वेळा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली आहे, मात्र तेथील पिच टीम इंडियासाठी फारशी अनुकूल राहिलेली नाही. 

बलाढ्य न्यूझीलंडवर मात 
टीम इंडिया आणि न्यूझीलंड केवळ टी20 विश्वचषकाच्या इतिहासात तीन वेळा आमनेसामने आले आहेत, आणि विशेष म्हणजे तिन्ही वेळा न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला आहे. त्यानंतर आज भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. यादरम्यान 2007 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने भारतावर 10 धावांनी विजय मिळवल. 2016 मध्ये टीम इंडियाचा 47 धावांनी पराभव झाला. तसेच 2021 च्या स्पर्धेत, न्यूझीलंडने 8 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे यावेळेस टीम इंडिया न्यूझीलंडसोबतचा हा फेरा पलटवणार का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा- Ind vs NZ T20 Final : नजर उतरवा…, लिंबू-मिरची फिरवा…, काहीही करा, पण इथे मॅच नको; क्रिकेटप्रेमींच्या भावना अनावर, का होतोयं हा स्टेडीयम इतका ट्रोल?

रविवारचा इतिहास बदलावा लागेल
ज्याप्रकारे टीम इंडियाचे चाहते अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचा संबंध भारताच्या पराभवासोबत लावतात त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट भारताच्या पराभवासोबत जोडलेली आहे. रविवार खेळल्या गेलेल्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांपैकी टीम इंडियाने फक्त एकच सामना जिंकला आहे. 2000 चा नॉकआउट ट्रॉफी, 2003 चा विश्वचषक, 2014 चा टी20 विश्वचषक आणि 2017 चा चॅम्पियन्स ट्रॉफीचे अंतिम सामने रविवारी खेळले गेले आणि भारताने ते सर्व हरले.

2023 च्या विश्वचषकापासून 2026 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत, भारतीय संघाने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 32 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त दोन सामने गमावले आहेत. यापैकी एक अंतिम सामना होता आणि दुसरा चालू विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सुपर 8 सामना होता. दरम्यान अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version