यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीमुळे हजारो पक्षांचा बळी गेला आहे तर शेकडो जनावरं जखमी झाले. बगळे, पोपट, चिमण्या, कावळे मृत्युमुखी पडल्याने त्यांचा खच झाडांखाली दिसून आला तर अनेक ग्रामस्थांच्या पाळीव कोंबड्या, बकऱ्या यांना फटका बसला आहे. पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी सुरू केलेला कुक्कुट पालन व्यवसाय मोडकळीस आला असून हजारो कोंबड्याचा देखील त्यात मृत्यू झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी गारांसह अवकाळी पावसाने आपले रौद्र रुप दाखविल्या नंतर सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी गावात गारासह पावसाची नोंद करण्यात आली आहे. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अमरावतीमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात गारपिटी झाली. मात्र या गारपिटीमुळे अमरावतीमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजून गेला आहे. तसेच फुलोरा अवस्थेत असलेला हरभरा, गहू, कापलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.