मुंबई : शिवडी पूर्व भागात जलवाहिनी टाकण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबई महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवडी पूर्व भागातील राजीव गांधीनगर, शिवडी गाडी अड्डा, गिरीनगर, रेती बंदर, इंदिरानगर हाजी बंदर, इंदिरानगर फोर्स बेरी रोड, कोळसा बंदर, अमन शांतीनगर, जय भीमनगर, पारधी वाडा आदी विभागांमध्ये सहा इंचाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. २०२१ च्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या कामाकरिता तरतूदही करण्यात आली होती. मात्र, ही जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे तेथे जलवाहिनीद्वारे घरापर्यंत पाणीजोडणी देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची मंजुरी मिळत नव्हती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.