Dhurandhar Worldwide Collection: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग अभिनीत स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ निर्माण करत आहे. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 15 दिवसांत 500 कोटींचा टप्पा ओलांडत इतिहास रचला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओजने केली आहे. निर्मात्यांनी अधिकृत एक्स अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या 15व्या दिवशी ‘धुरंधर’ने 23.70 कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन 503.20 कोटींवर पोहोचले आहे. पोस्टमध्ये ‘इतिहास पुन्हा लिहिला गेला, आतापर्यंतचा सर्वात जलद 500 कोटींचा आकडा’ असे नमूद करण्यात आले. याआधी हा विक्रम ‘पुष्पा 2: द रूल’कडे होता. अल्लू अर्जुन अभिनीत या तेलुगू चित्रपटाने 11 दिवसांत 500 कोटींचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता ‘धुरंधर’ने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘स्त्री 2’सारख्या चित्रपटांचे विक्रमही मागे टाकले आहेत.
परदेशातही ‘धुरंधर’ची घसघशीत कमाई
भारतातच नव्हे तर परदेशातही ‘धुरंधर’ने मोठी कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या 16 दिवसांत या चित्रपटाची जागतिक कमाई 800 कोटींच्या पुढे गेली आहे. शनिवार, 20 डिसेंबर रोजी हिंदी (2D) थिएटरमध्ये चित्रपटाची एकूण प्रेक्षक उपस्थिती 52.42 टक्के होती. दुपार, संध्याकाळच्या शोमध्ये प्रेक्षकांची विशेष गर्दी दिसून आली.
Another day, another record shattered! ?✨ Book your tickets.
? – https://t.co/cXj3M5DFbc#Dhurandhar Igniting In Cinemas Worldwide.@RanveerOfficial #AkshayeKhanna @duttsanjay @ActorMadhavan @rampalarjun #SaraArjun @bolbedibol @AdityaDharFilms #JyotiDeshpande @LokeshDharB62… pic.twitter.com/2K6gVxAqnA — Jio Studios (@jiostudios) December 20, 2025
कथानक आणि कलाकारांची जादू
‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगने हमजा या गुप्तहेराची भूमिका साकारली असून, तो कराचीमध्ये दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसखोरी करतो. 2001 चा संसदेवरील हल्ला आणि 26/11 मुंबई हल्ल्यासारख्या वास्तविक घटनांपासून प्रेरणा घेतलेली ही कथा भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण पार्श्वभूमीवर आधारित आहे. रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकूणच, दमदार कथा, भव्य मांडणी आणि स्टारकास्टच्या प्रभावी अभिनयामुळे ‘धुरंधर’ हा 2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरत असल्याचे चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.