JD Vance’s Home Attack: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या घरावर हल्ला; दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या

सोमवारी पहाटे झालेल्या या घटनेत त्यांच्या घराच्या अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने, हल्ल्याच्या वेळी उपराष्ट्रपती व्हान्स घरी उपस्थित नव्हते.<br/>
JD Vance’s Home Attack: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या घरावर हल्ला; दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या

JD Vance's Home Attack: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या ओहायो येथील खासगी निवासावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे झालेल्या या घटनेत त्यांच्या घराच्या अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने, हल्ल्याच्या वेळी उपराष्ट्रपती व्हान्स घरी उपस्थित नव्हते.

गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची कारवाई

सीएनएनने (CNN) दिलेल्या वृत्तानुसार, ओहायोमधील ईस्ट वॉलनट हिल्स येथील घराच्या परिसरात एका व्यक्तीने अचानक घुसखोरी केली आणि तोडफोड सुरू केली. घटनेची माहिती मिळताच 'सिक्रेट सर्व्हिस' (Secret Service) आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास यंत्रणा करत आहेत.

हेही वाचा – Donald Trump : रशियाच्या तेलावरून डोनाल्ड ट्रम्पचा भारताला इशारा; म्हणाले, '…तर अमेरिका आयात शुल्क वाढवू शकते'

व्हेनेझुएलावरील लष्करी कारवाईचे समर्थन

विशेष म्हणजे, हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा जे.डी. व्हान्स यांनी व्हेनेझुएला विरुद्धच्या अमेरिकन लष्करी कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये व्हान्स यांनी व्हेनेझुएलावर अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याचा आरोप केला आहे. व्हेनेझुएला जप्त केलेल्या तेल संपत्तीचा वापर अंमली पदार्थांच्या दहशतवादी कारवायांना निधी देण्यासाठी करत आहे. केवळ फेंटानिलच नाही, तर कोकेन तस्करी हा लॅटिन अमेरिकन ड्रग्ज कार्टेलच्या नफ्याचा मुख्य स्रोत आहे. जर आपण हा पैसा रोखला, तर या टोळ्या कमकुवत होतील, असे मत व्हान्स यांनी व्यक्त केले होते.

हेही वाचा – Kamala Harris: 'ही कृती बेकायदेशीर आणि वेडेपणाची'; कमला हॅरिस यांचे ट्रम्पवर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे गंभीर आरोप

वादाच्या पार्श्वभूमीवर हल्ला?

व्हान्स यांनी व्हेनेझुएलाबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि लष्करी कारवाईच्या समर्थनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. या विधानांच्या काही तासांतच त्यांच्या घरावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याचा शोध आता गुप्तचर विभाग घेत आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version