भाजप नेते किरीट सोमय्या आज कोर्लई गावात दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या येणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती भागात पोलिस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, किरीट सोमय्या कोर्लईत येताच तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. तसेच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
किरीट सोमय्या ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर तेथे शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमन-सामने आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंचायत कार्यालयात सोमय्या गेले. सोमय्यांनी ग्रामपंचायतीसोबत कोणतीही विचारपूस न करता केवळ ड्रामेबाजीसाठी आले असल्याची टीका सरपंच प्रशांत मिसळ यांनी केली आहे. तसेच किरीट सोमय्या निघून जाताच शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचे गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.